Wednesday, 17 October 2018

Appraisal कठीण कि बायकोशी भांडण !!

असा प्रश्न आहे मला,
Appraisal कठीण कि बायकोशी भांडण,
Appraisal कस ही झालं,
तरी चालू राहतो salary चा meter,
भांडण झालं मस्त,
तर बहुतेक नाहीच मिळत जेवण,
सोप्प नाही येवढ बायकोशी भांडण !!

प्रश्न तसा बराच आहे माझा,
Appraisal कठीण कि बायको शी भांडण,
नाही म्हणलं तरी थोडा chance असतो,
भांडणात सूर जर चांगला गवसला,
तर बायको रुसेल, फुगेल, रडेल, वगैरे वगैरे,
पण Appraisal म्हणलं कि एकच outcome,
रुसायचं मीच, फुगायचं ते मीच आणि रडायचं ते पण मीच,
सोप्प नाही तसं जाणे सामोरे Appraisal !!

काळ तो आला कि प्रश्न पडतोच मला,
तो काळ म्हणजे, Appraisal चा  काळ,
Appraisal कठीण कि बायकोशी भांडण,
कळत नाही उत्तर बुवा नेमक,
नाही म्हणलं तरी प्रश्न कठीणच तसा,
दोन्हीपैकी कश्यालाच नाही option,
Appraisal दर वर्षी येणारच,
आणि बायकोशी भांडण तर 3 वेळच जेवण,
कळत नाही कस ठरवावं Appraisal कठीण कि बायकोशी भांडण !!

1 comment:

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...