महाली राहण्याचं स्वप्न, घेऊन उराशी निजलो,
पाहतो काय, प्रातःकाळी महाल थाटला उभा,
रात्र होती ती काही वर्षांची, झोप होती ती काही अथांग श्रमांची,
बघता बघता, उचित जमून आलं आणि साजेस घडत गेल,
फक्त, स्वप्नांनंतर, निर्माण झ्हाली ती लालसा …
पाहतो काय, प्रातःकाळी महाल थाटला उभा,
रात्र होती ती काही वर्षांची, झोप होती ती काही अथांग श्रमांची,
बघता बघता, उचित जमून आलं आणि साजेस घडत गेल,
फक्त, स्वप्नांनंतर, निर्माण झ्हाली ती लालसा …
हृदयाची गत छिन्न विछिन्न,
मनाची काया नाही काही भिन्न,
आकांक्षांच आभाळ, आसक्तींची विकृत माळ,
पुढच्या पावलावर कोसळेल तो निर्मित महाल,
पण, मजबूत आहे ती निर्माण झ्हालेली लालसा …
आकर्षण केंद्र स्थित करण्याची वृत्ती,
दिव्यांची झीरमिल, रंगांची उधळण, रांगोळीत फुलांची आकृती,
मन प्रसन्न, ध्येय स्पष्ट आणि डोळ्यात स्वप्न,
लालसा असावीच, तर फक्त कष्टाची आणि परोपकाराची,
असावीच लालसा, तर फक्त मन भरून जगण्याची …