Thursday, 6 June 2019

जीवन वावरत

कधी कळत नाही, दिस पळते होत,
वेदनांच्या वेढ्यात क्षणिक गोडव्याची चव,
काहीसे चिंब भिजुनी अश्रूंच्या पावसात,
लखलखते चांदणे जणू पाडते लक्ख सूर्यप्रकाश …

सावल्यांचा अपघातात विजांचा कडकडाट,
त्या फुलाचा स्पर्श फुलवी कोमलशी सांज,
क्षितीजाच्या रंगात रंगुनी, भरून गगन भरारी,
काहीश्या मर्म स्वरात कागदाचे पक्षी कोकिळेवानी गात...

रम्य वनी पर्णकुटी वास्तव्यात,
भव्य मंदिर नदीकाठी सानिध्यात,
सागरा, लाटी वाळू आणि शिंपले बोलती,
आभाळ निरभ्र पाही जल्लोषात,
फक्त, मनी कल्पनेत चौहीकडे जीवन वावरत…

1 comment:

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...