Tuesday, 16 October 2018

Mobile 'देवा' चरणी आरती

Mobile एक अत्यावश्यक गोष्ट नव्हे, तर आज काल देव झाला आहे ...
त्या 'देवा' चरणी, माझ्या कडून एक आरती समर्पित
-----------------------------------------------------------------------------------------

जय Mobile राया, पडतो आम्ही तुझ्या पाया,
कुठला हि धर्म, कुठली पण जात,
व्यापक तू किती, औरच तुझी बात,
नाही कुणी तुझ्या शिवाय राहत ...

हे Mobile राया, सुंदर तुझी काया ,
Wifi, Bluetooth आणि Network असे तुझे बलाढ्य हात,
वापरात आहेस सगळ्यांच्या, आई असो किंवा तात,
वाजतोस तू मस्त, गाणी छान छान गात ...

देवा रे देवा, वाटतो तुझा हेवा,
तुजला वाहतो फुलं, करून तुला Charge,
करतो दिव्याची आरती, टाकून तुझ्यात Recharge,
पाहतो आम्ही वाट, तू नेहमी नेहमी वाज ...

प्रिय तू Mobile ईश्वरा ,
होते अस कि तुझ्या समोर बाकी सगळं विसरा,
Whatsapp, Facebook, Twitter तुझे अस्त्र,
मिळतात तुला सुंदर सुंदर cover ची वस्त्र,
नाही तुला काहीच पर्याय,
तूच खरा प्रभू, सगळ्यास तू लाभ ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...