Monday, 10 February 2020

सुसंवाद

अंतराळ काळोखात, सूर्य प्रकाशात, पृथ्वी पाण्यात आणि मी दबावात,
आयुष्याची परिभाषा करत राहण्यात, जगण्याचा आनंद घेणं राहून जातंय ....

शोध नाही कश्याचाच, दिवस त्रासात आणि रात्र औषधात,
उद्देश्य नाही विचारात, योजना नाही आकारात, कुटुंब नाही हृदयात ....

भावनांना शब्दात रंगवण्यात आणि त्या चित्राला डोळे भरून पाहण्यात,
काव्याकृती जन्माला येण्यात आणि त्याची संगोपना एका कलाकृतीत होण्यात,
जे उत्पन्न होतं मनात, कदाचित त्याचीच व्याख्या करत असावेत लोक - "सुख आणि समाधान" ....

कोणासाठी नव्हे, पण फक्त स्वतःच्या धगधगत्या ज्वाला रूपांतर कराव्यात शीतल प्रवाहात,
जन्म असावा तो वृक्षासारखा, स्वार्थ शोधाल तर मिळेल काय,
पक्ष्यांचं घरटं, जीवांना सावली, फळांची मधुरता, फुलांचा सुगंध आणि वायूस शुद्धता,
नाही असं काही चमत्कारिक, अगदी सूर्य म्हणलं तरी प्रसारित करतो आग ...

शिल्पकार एक मी, काव्य माझी रचना,
आईचा जसं जीव बाळात, तसं नव्हे पण तसच काहीसं निष्पन्न,
मनाची शांतता आणि जीवनाची आकृती - प्रबळ आहे कवी मनाचा सुसंवाद ....

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...