Sunday, 21 June 2020

मैत्री

मैत्री पण नातच आहे,
अनोळखी लोकांना जवळ करण्याच सुंदर नाव आहे,
टिकेल तर वरदान, नाहीच तर आठवण आहे,
अजून काहीच नाही तर इतिहास नक्कीच आहे ......

चांगले मित्र मिळण्याचं सौभाग्य लाभणं म्हणजे गौरव,
कारण आई वडिलांनंतर कुणी घडवू शक्त तर ते म्हणजे मित्र,
कधी कान ओढून, तर कधी मार्ग दर्शवून, तर कधी मदद करून,
जो मित्र म्हणून जगू शकला, तोच खरं आयुष्य समजला ......

मित्रांची देणगी म्हणजे आहे दौलत,
शेकडोंनी असले तरी वाटतात कमी,
कधी एक असला तरी येऊन जातो कामी,
मैत्री करून नाही, कधी निभावून पहा,
नाही लागला लळा तर मैत्रीच ती कसली ......

जीवन आहे एकदाच, जगून तरी पहा,
मी काय म्हणतो, एकदा मित्र होऊन तरी पहा ......

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...