Tuesday, 16 October 2018

बाल कविता : कावळा

कसा हा कावळा, मस्त काळा सावळा,
छान रुबाबदार, ऐटीत  कावकावणार ,
लहानपणा पासून ऐकतोय, शेणाच्या घरात राहणारा,
असा हा काळुराम, चिमणी ला त्रास देणारा ...

राज्य ह्याच छोट, छोटीशी भरारी,
उंच नाही उडता येत, लढण्याची नेहमी तयारी,
कुणाशी भांडणारा आणि कुणालाही वैताग देणारा,
नेम नाही काही, अशी ह्याची ख्याती ...

खूप तशी हुशारी, लपवत नाही कधी,
IQ मध्ये सगळ्यात पुढे, विश्वास नाही बसत,
कुठलाच प्राणी नाही ह्याला घाबरत,
पण कावकाव येवढी कर्कश्य, कुणालाच नाही आवरत ..

कसा हा कावळा, मस्त काळा सावळा,
राहतो असा, जसा एखादा शूर मावळा,
कसा हा कावळा, मस्त काळा सावळा ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...