Tuesday, 16 October 2018

मज्जा

दिवस कसा मजेत जावा,
उषःकाळी असा निर्धार असावा,
काहीसा कठीण, काहीसा अवगढ,
काहीसाच कठीण, काहीसाच अवगढ,
थोडीशी मस्करी, थोडीशी बडबड,
आज 'मज्जा आली', हा रात्री भाव असावा ...

तिखट, कडवट, काटेरी, दुर्गंधी,
सगळ असणारच कि, सारखच कस साध आणि सरळ,
पण "Beauty lies in the eyes of the beholder",
काही कराव बेरीज, काहीस वजा,
मिळू शकेल नक्कीच, पाहिजे असलेली मज्जा ...

अशक्यच आहे, हे ही शक्य,
अता कस, अता काय, हा पडतो प्रश्न,
मज्जा कसली, जगणं पण कठीण,
वेडा होयच बाकी आहे, हे होतात बोल,
कसब लागते पणाला, पण दिवस खडतर,
नाही रोजच येत मजा, नशीब ठरत बलवत्तर,
तरी ही, प्रयत्न हा आहेच आपल्या हाती,
काय सांगाव, त्यात ही मजा आपणा सापडावी,
चमत्काराची आशा काच सोडावी ...

मज्जा अनुभवायची इच्छा कायम असावी,
दिवस कशे ही येऊ शकतात,
काय सांगाव आज शेवटची ठरावी,
पण, दिवस मजेत जावा,
उषःकाळी हा निर्धार प्रबळ असावा ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...