Tuesday, 16 October 2018

एक romantic कविता, जमतीये का बघावी

संगिनीची कल्पना मनात यावी,
मृगनयनी, काळजात जशी कट्यार घुसावी,
चंचळ, प्रेमळ, मंजुळ, बावरी,
एखादी कविता जशी मनात उतरावी ...

मृदूळ, सुंदर, हळवी, वेंधळी,
हसावी अशी सुरांची मधुरता जशी,
बोलावी अशी पारिजाताची कोमलता जशी,
एखादी अप्सराच धरावर उतरावी, तशी ...

जन्मो-जन्मीची  गाठ बांधुनी,
क्षणो-क्षणी आठवणीत राहावी,
प्रेयसी आयुष्याच सोनं करुनी,
मनोमनी घर करणारी,
जादूगाराने एखादी जादू करावी तशी ...

भलतीच कठीण आहे बुआ.. ह्याच्या पलीकडे जमणार नाही :-)

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...