Wednesday, 17 October 2018

दैवत - आई आणि बाबा

नाही मी बघितला प्रत्यक्षात देव,
बघितले आहेत ते फक्त आई आणि वडील,
चिमण्या बाळा सारख वाढवलं,
पदोपदी सावरल, प्रेमाने न्ह्यार्ल ,
आहे कुणी माझे देव, तर ते आई आणि वडील एकमेव  ...

नाही कदाचित काही जगा पेक्षा केल वेगळ,
पण घडवलं आहे मला त्यांनी ओतून जीव,
खूपच पुण्य असतील माझे गतजन्मी ,
मिळाले नसते हे आई बाबा ह्या जन्मी,
किती सुदैवी, वाढलो त्यांच्या चरणी ...

आईची माया आणि बाबांचं प्रेम,
मन भरून मिळाल, नाही जेमतेम ,
नसले ते आज, तरी जीवंत आहेत आठवणीत,
मार्ग दर्शवतात, नाही कधी कमी पडत,
आशीर्वाद येवढे की आयुष्यभर पुरतील,
शक्य आहे का, पुन्हा एकदाच भेटतील ...

आईच व्यक्तित्व, किती आहे विशेष,
सगळे दिले आनंद, सगळे घेतले क्लेश,
वडिलांचा आवेश पण केला आहे परिधान,
कशी ती कर्मठ, करते सगळे कर्तव्य,
आहे अजून पुढे आयुष्य, होईल कस समाधान ..

नाही मिळणे दुसरे, अशे देवाने दिले,
देव नाही बघितला, बघितले ते आई आणि बाबा,
आदर्श आहेत ते माझे, एकापेक्षा एक ,
नशीब माझ चांगल, मी त्यांचाच लेक ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...