Tuesday, 16 October 2018

त्रास त्रासिक असतो

त्रास अर्थात त्रासच असतो,
कुणी म्हणलेलं ऐकलं नाही मी,
आज खूप मजा आली, मस्त त्रास झाला,
हे ही कधी ऐकलं नाही मी,
आज खूप त्रास करून घेऊ यात ...

त्रासाचे पण प्रकार असतात,
एक त्रास जो स्वताहाच वाईट झाल्यावर होतो,
दुसरा त्रास जो दुसऱ्याच चांगल झाल्यावर होतो,
त्रास तसा त्रासिकच असतो,
कसा ही असला तरी जीवाला घोरच लावतो ...

त्रास छान पण असतो बरका ,
कष्ट केल्याचा त्रास असा की सुख अंगी लागल्या शिवाय राहणार नाही,
आणि कष्ट न केल्याच सुख त्रास दिल्या शिवाय राहणार नाही,
दोन्ही प्रकारे त्रास आहेच की, कष्ट करायचा काय आणि कष्ट नाही घेण्याचा काय,
त्रास म्हणजे लग्नासारखाच की काय मग,
" जो खाये वो भी पछताए, जो ना खाये वो भी पछताए ",
त्रास तसा कष्टदायकच दिसतोय ...

त्रासाचे फायदे पण असतात  बरका,
कामावर जायला नको, त्रास फार उपयोगी येतो,
पोटात दुखणे, कंबर धरणे, अशेच त्रास कामी येतात,
जेल मधून सुट्टी पाहिजे, हमखास उपाय तब्येती चा त्रास,
त्रासाचा फायदा करून घ्यायला, कमी कुठं पडत का कुणी ...

त्रास पण  तसा त्रासदायकच असतो,
कुणालाही नकोच असतो, पण झाल्या शिवाय राहत नसतो,
जडच पडतो, छोटा किंव्हा मोठा, कसा ही असो,
थोडा प्रेमाने हल्का होतो, पण तसा जडच पडतो ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...