Wednesday, 17 October 2018

माणसाची किंमत

एक माणूस कुठल्या तरी जगात मौल्यवान आहे का,
माझा जवळचा नसला तरी  कुणाच पूर्ण जग आहे का,
नसेल वाटत कुणाला तरी, कुणाचा मानाचा तुरा आहे का,
माझा कुणी ही नसला तरी, कुणाचा जीवनाचा आसरा आहे का,
किंमत कुणाची कुणी करू नये, कुणाचा तरी हिरा आहे का ...

म्हंटलं तर आपले, नाही म्हंटलं तर कुठले,
चांगल्यासाठी झगडणारे कि वाईटावर टपलेले,
सवयी प्रमाणे चालणारे, स्वभावाप्रमाणे वागणारे,
कशेपण असले तरी आपल्या जगाचा भाग असणारे,
किंमत असलेले किंवा नसलेले, आपल्या आयुष्याचा भाग आहेतच ना ...

थोडंस हसवणारे, कधी रडू आणणारे,
माणसंच आहेत जे असतात किंमत लावणारे,
कुठल्या ना कुठल्या कारणाने आठवणीत राहणारे,
किंमत लावू त्येवढी कमी वाटणारे,
राग-राग करवून आपलेशे होणारे,
लेखू तेवढे कमी अशे प्रेमळ माणसं जगातले,
जवळचे असतात काही, जीवाला घोर लावणारे ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...