Wednesday, 17 October 2018

वाटचाल, जीवना नंतरची

राहते फक्त आठवण, आयुष्याच्या नंतर,
कधीच संपलय जीवन, निर्माण करून अंतर,
न काही आशा, न काही अपेक्षा, न काही पाश,
राहत लक्षात, फक्त एक नातं .. प्रेमाच ...

ओतून जीव जगला, तू कुणा साठी तरी,
ओतून जीव जगलं, कुणी तरी तुझ्यासाठी ,
नाही मोजून मापून काही, शक्य नसतं ते,
जीवात जीव गुंतला, आपोआप घडतं रे,
पश्च्यातच जाणवत, खूप काही झालय,
कमी नाही केल, पण थोडं कमीच पडलय ...

माझ कस बरोबर  हेच भांडलो असताना,
कुठं काय चुकलंय, हेच शोधतो संपल्यावर,
फार मोठ्ठा नाही अवधी तुझ्या माझ्या कडे,
नको चूक नको बरोबर, नको तुझ नको माझ,
साथ आणि श्वास, हीच असते फक्त गरज,
दोन्हीवर पडतो अचानक पूर्णविराम,
कधी तरी संपणार, हेच ठरतंय अंतिम सत्य ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...