Wednesday, 17 October 2018

घे रे तू झेप

निरभ्र आभाळा खाली, कुठं तरी चुकतंय,
कालचक्र कुणालाच कुठं काही कळू देतय,
प्रश्नाचा आरसा नाही सामोरं, प्रतिबिंब नाही सत्याचं,
आनंदाच्या मागावर, प्रयत्न आहेच कि प्रत्येकाचा ....

सावल्यांच्या काळोखात कस शोधायचंय,
ह्या जगाच्या पाठी तर विश्व निजलंय,
कारण आहे मी कि तू, रहस्य उभ थाटलंय,
नाहीचा पाडा आहे तर तो फक्त उत्तराचा,
नाहीच मी सापडणार अस हे लबाड म्हणतय ...

अपेक्षांचं ओझं, भंगांचं सत्र,
काळीज हळवं, गावं सुंदर वाटतय,
प्रेमाचे क्षण, थोडेशे नखरे,
घे रे तू झेप, आग्रह करते वेळ थेट,
किंचित प्रवास, मग आहेच प्रयत्नांची यशाशी भेट ....

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...