Thursday, 13 February 2020

भारत

देश म्हणजे व्यक्तिमत्व, देश म्हणजे विचारधारा,
भारताचं व्यक्तिमत्व विकसनशील राष्ट्र,
जाणणं कठीण भारताची विचारधारा,
१३० कोटी लोक - कशी करायची परिभाषा,
बहुतेक, कदाचित ती असू शकेल -  "कमवणे पैसा" ....

गरिबाला हवा पैसा, श्रीमंताला हवा अजून पैसा, देशाला हवा अफाट पैसा,
शिक्षण करायचं नोकरीसाठी, नोकरी करायची पैश्यासाठी आणि पैसा गुंतवायचा पैश्यासाठी,
रोजच्या धकाधकीत हरवलं आहे मूळ भारतवर्षाचं गुणसूत्र,
ज्ञान, शास्त्र, गणित, योग, संगीत, समृद्धी, प्रगती - कुठं गेली ती ठेवण ....

लुप्त झालेलं अर्जन होईल, विसरलेला वारसा पुन्हा मिळेल,
भारत हरलेला आहे, पण मेलेला नाही,
आहेत समस्या, आहे भ्रष्टाचार, आहे आरक्षण, आहे धर्म आणि जाती, आहे दारिद्र्य,
मान्य आहे, सगळं मान्य आहे, परंतु आहे, थोडासा का असेना - विश्वास, थोडीशी का असेना - आशा,
थोडेशे का असेनात - लोकं - विचारवंत, बुद्धीमंत, गुणवंत, कुशल, धैर्यशाली, आहे मनी आकांक्षा ...

शेवटी आहे ती म्हण - "प्रयत्नांती परमेश्वर" .....

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...