Wednesday, 17 October 2018

Average to Excellent, Personally

Excellent म्हणलं तर छान वाटत,
Average म्हणलं की त्रासच तसा होतो,
भले ही माझ सगळं Average का असे ना,
पण Above Average वाटण्याची आभा औरच आहे काही,
माझ्या गाड्यां पासून माझ्या घरा पर्यंत,
सगळ जरी  'Average' असलं, तरी पण 'Average' चा त्रास होतो,
मी तर 'Above Average', 'Excellent' पाहिजे ...

माझे grades excellent पाहिजेत, salary उच्च श्रेणीची,
मुलगा, नवरा, वडील, भाऊ, मित्र, नातेवाईक कसा चांगला होऊ शकेन,
विचारच नाही केला कधी, तर कसा excellent असणार मी,
वाटतंय एका अर्थी 'Average' मधेच मोडत आहे मी ...

वेळो-वेळी  कठीण प्रसंगी, दर समयी नशिबाची कठोर भिंत,
हीच ती परीक्षा, हेच ते क्षण, हेच ते अतूट प्रयत्न,
कसा काय अडकलोय, कसा काय रखडतोय, कसं ठरतंय अशक्य,
विचित्र कसं येवढ घडतंय, कि आहे सगळं साजेस,
'Average' ला गाठलंय, हेच झालय का मोठ गंतव्य,
कुठे तरी काही तरी चुकतंय, कळत नाहीये जे ...

अर्धा glass भरलेला, कि अर्धा glass रिकामा,
आहे मी भाग्यवान, कि नाही नशिबाची साथ,
'Below average' नसण्याचा नाही होत आनंद,
'Excellent' नसल्याचा होतोच तसा त्रास,
पण खरंच आहे ना अर्धा ग्लास भरलेला,
आनंद आहे मानण्यात, नाही कुरकुर करण्यात,
आनंदी राहण्यात नक्कीच 'excellent' व्हायला हव,
कदाचित मगच मुलगा, नवरा, वडील, भाऊ चांगला होणं शक्य ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...