Wednesday, 17 October 2018

माणसांची नाती

माणसांची नाती, जश्या असतात वाती,
फक्त ठरवायचं दिव्याच्या कि बारुदाच्या ,
काही असतात गोड़ आणि काही खातात माती ...

मनवतात तशे दसरा आणि दिवाळी,
मज्जा घेतात शेरो-शायरी, कव्वाली,
सांभाळली जाते का साधी घरवाली,
म्हणे निघालोय जिंकायला जग, साले मवाली ...

मित्रांचे मित्र, मेहफिल दारूची ,
शेंगदाणे मस्त, plate म्हणा खारूची ,
संपत नाही, इथंच तू आणि इथंच मी,
बाटली उतरली कि सुंदरच वाटत सगळं,
प्रेम जात ओतू, जिगरी सगळी मित्र मंडळी ही ..

शत्रूपीडा नको म्हणलं तरी घनिष्ट,
म्हणतात काही जण त्यांना आपले वरिष्ठ,
मांडून ठेवायचा ताटात जगभराचा छळ,
आहे कि नाही सांगा पैसा हाताचा मळ,
पण ह्याच मळासाठी चालू असते चळवळ,
त्याच्यासाठी सोसायला लागतेच शत्रूंची कळ ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...