Wednesday, 17 October 2018

प्रवास एकट्याचा

आयुष्य हे एकमेका सोबत असलं, तरी ते एकट्याच आहे,
सगे-सोबती, मित्र, प्रेमी सगळे आहेत,
पण आलो मी एकटाच, जाणार तो ही एकटाच आहे,
दुःख मलाच सोसायचं, आणि सुखाचा अनुभव माझाच आहे,
ह्या एवढ्या मोठ्या जगात कसा मी एकटा आहे ...

प्रत्येक क्षणी फक्त मीच माझ्या सोबत आहे,
दर विचार, दर शब्द, दर कल्पना,
कस कुणी समझेल, कस कुणी जाणेल,
ते माझ्या मनी आहे, ते मलाच माहित आहे,
काहीच न करू शकण्या एवढा मी खरंच एकटा आहे ...

माझ ध्येय, माझा ध्यास, माझ क्लेश, माझा श्वास,
प्रयास तो माझाच, विश्वास तो पण माझाच,
कष्ट ते माझे, आनंद तो माझाच,
सगळ आहे माझच, मग का नाही मी  मानत,
कि प्रवास हा माझा, आयुष्य शेवटी एकट्याचंच ...

नित्य नियमाने, गहन विचाराने,
माझ मला कळत आहे, सगळ्यांच्या सान्निध्यात,
आहे मी एकटा, जगत आहे  एकाकी,
करत आहे प्रवास,  माझा मी एकट्याचा ....

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...