Tuesday, 16 October 2018

काही तरी वेगळ

काही तरी वेगळ ल्ह्याव म्हणून बसलोय,
पण विश्व हे स्वताहातच गुंतलय,
काम, कुटुंब, घर, तब्येत, growth,
ह्या पलीकडं वेगळ काय,
प्रश्नांचं उत्तर कुठं सापडतय ...

प्रयत्न करणार, वेगळ्याच ध्यास आहे,
स्वताहात एवढं गुंततो का आपण,
कि कुणा बद्दल लिहणं मनात पण येऊ नये,
आज स्वताहाच नाही, कुणाच तरी टिपणार ...

कोणी खुश आहे तर कोणी झुंझतयं,
कोणी स्वताहात तर कोणी दुसऱ्यात गुंतलय,
कोणी दोन वेळच्या भाकरी साठी झगडतय,
तर कोणी आयुष्यात सुखाने रमलाय,
कुणाचा कुणाला पडलय, मजेत आयुष्य चाललय ...

काही तरी वेगळ म्हणजे काय,
कुणाच कुणाला काही काच पडावं ,
मी आणि माझ आयुष्य छानच चाललय ...

नक्की काय करायच, आणि कस,
मजा नको, सुख नको, आणि काम कुणी करायच,
विचार तरी करावा, पुण्याच काही जमेल का,
रोजच्या आयुष्यात नित्य कामा सोबतच,
एखाद तरी वेगळ अस काही ऊमझेल का ...

रोज जसा सौख्याचा असतो निर्धार,
तसाच दुसऱ्याचा करेन का एकच विचार,
काही तरी चांगल असा प्रयत्न होणार का,
काही तरी वेगळ स्वतः पलीकडे करणार का ....

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...