Wednesday, 17 October 2018

अनपेक्षित आणि भाग्य

कस सामोरे जायच अनपेक्षितला ,
अनपेक्षित हे होतच राहणार आहे,
चांगल्यात मोडो नाही तर वाईटात,
हाताळणे अनपेक्षित कठीणच ठरते ...

जीवन-चक्र काय, कधी आणि कस फिरेल,
नेम नाही कश्याचा, काय संपेल आणि काय उरेल,
चांगल असेल तर वाईटाची आठवण ठेवावी,
आणि वाईट असेल तर चांगल्याची आशा धरावी,
अनपेक्षित कठीणच पचवणे, भेटणार पण नक्की ...

घडवणार हेच तुम्हा आम्हास, झेपलं तर यश,
नाही झेपल तर मात्र नसाव ते अपयश,
फक्त एक अनुभव, काही तरी शिकवण ...

अनपेक्षित आनंददायी, मनास पुरेपूर भावणार,
किती पण उत्स्फूर्त असे ना , जास्त नाही टिकत,
भान थारावरच असाव, लक्ष्य जास्त ठेवाव,
श्रम अधिक आणि लक्ष्य छोट्याच मोठ्ठ कराव ,
हीच ती वेळ, भाग्य चांगल्यातन उत्तम गाठाव ...  ...

अनपेक्षित त्रासिक, मनास झळ लावून जाणार,
किती पण नैराश्य असे ना, क्षणिक बनू शकतं,
भान थारावरच असाव, लक्ष्य जास्त ठेवाव,
श्रमाची साथ आणि लक्ष्यावर नज़र कायम,
हीच ती वेळ, भाग्य बनवण्या आणि घडवण्याची ,
अनपेक्षितला पचवण्याची, काहीतरी करून दाखवण्याची ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...