Wednesday, 17 October 2018

आनंदाची कारण

लेकराला बघितल कि आनंद उसळतो माझा,
आणि लेकरू आईच्या कुशीत हसत खेळत आनंदी,
आईने माझ अस काही नाही केल, जिचा मी लेक,
कि तिला बघून तसाच आनंद होऊ नये मला,
मी खूप मोठ्ठा झालोय वाटतंय, कि आईची माया विसरलो आहे आता ...

काम मना सारख आणि त्यात भरगोस यश मिळाल कि प्रसन्न चित्त माझ,
पण तोच आनंद का नाही वाटत बायकोच्या कष्टांचा,
भले पहाटे उठून आवरण, रात्री अपरात्री बाळाला सांभाळणं,
दिवस भर त्रेधा तिरपीट करून कामावर राबणं,
कस मला जाणवत नाही कि तिच्या पण मुळे आहे चालू आयुष्य माझ ...

काही तरी छान सुचलं आणि कवितेत उतरलं कि हर्षित होतो मी,
अल्पायुष्यी का असतो आनंद पण हा, वेळे बरोबर टिकत नाही का,
राहात का नाही आठवण, कि मी आहे खूप नशीबवान,
सगळंच आहे माझ्याकडे, जास्तच दिलय मला गरजेपेक्षा ,
काहीच नाही कमी, फक्त वाढवायची आहेत आनंदाची कारण ...

जस छोट्या छोट्या गोष्टींचं होतं irritation आणि frustration,
तसं का नाही करत साध्या साध्या achievementsच  celebration आणि jubiliation,
आनंदाची कारण मोजकीच कशी, किती हा आनंद दुर्लभ,
काही तरी कराव आणि व्हावा आनंद  पदोपदी , express जशी जलद,
मनात असावा झरा, निघावा त्यातून आनंददायी दुर्मिळ रसद,
फक्त मीच नव्हे, तर आनंदी व्हाव औतीभोवतीच  जग  माझ्यासोबत ...

No comments:

Post a Comment

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...