Saturday, 15 February 2020

गरज, आवड, इच्छा

गरजेतून मिळाली थोडी मोकळीक,
मना वरचं ओझं थोडं हलकं आणि झाले पाश ढिले,
श्वास घेणे थोडं सोप्प आणि विचार करणं थोडं निवांत,
आता फुलेल का, बहरेल का, बोलेल का, अंतर्मन माझं ....

घेईल का माझी कोणी हळुवार पणे काळजी,
खूप दमलो आहे मी, खूप जखमी आहे मी, खूप बंधनात आहे मी,
इच्छा राहिल्या नाही काही, आकांक्षा लादल्या आहेत माझ्यावरच मी,
कर्तव्य आणि जबाबदारीत जखडून घेतलं आहे स्वतःला मीच,
थोडंसं अता शांतते कडे वळतो मी, थोडीशी निश्चिन्त झोप घेतो मी ....

पुन्हा जगेन मी, जगवेन मी, बोलेन मी, आइकेन मी,
थोडीशी झोप पाहिजे मला फक्त, थोडीशी मोठी निश्चिन्त झोप ....

कदाचित कळतील मला माझ्या इच्छा, माझ्या आवडी, माझ्या आकांक्षा,
गरजेतून मिळाली आहे मला नितांत गरज असलेली थोडीशी मोकळीक ....

Thursday, 13 February 2020

भारत

देश म्हणजे व्यक्तिमत्व, देश म्हणजे विचारधारा,
भारताचं व्यक्तिमत्व विकसनशील राष्ट्र,
जाणणं कठीण भारताची विचारधारा,
१३० कोटी लोक - कशी करायची परिभाषा,
बहुतेक, कदाचित ती असू शकेल -  "कमवणे पैसा" ....

गरिबाला हवा पैसा, श्रीमंताला हवा अजून पैसा, देशाला हवा अफाट पैसा,
शिक्षण करायचं नोकरीसाठी, नोकरी करायची पैश्यासाठी आणि पैसा गुंतवायचा पैश्यासाठी,
रोजच्या धकाधकीत हरवलं आहे मूळ भारतवर्षाचं गुणसूत्र,
ज्ञान, शास्त्र, गणित, योग, संगीत, समृद्धी, प्रगती - कुठं गेली ती ठेवण ....

लुप्त झालेलं अर्जन होईल, विसरलेला वारसा पुन्हा मिळेल,
भारत हरलेला आहे, पण मेलेला नाही,
आहेत समस्या, आहे भ्रष्टाचार, आहे आरक्षण, आहे धर्म आणि जाती, आहे दारिद्र्य,
मान्य आहे, सगळं मान्य आहे, परंतु आहे, थोडासा का असेना - विश्वास, थोडीशी का असेना - आशा,
थोडेशे का असेनात - लोकं - विचारवंत, बुद्धीमंत, गुणवंत, कुशल, धैर्यशाली, आहे मनी आकांक्षा ...

शेवटी आहे ती म्हण - "प्रयत्नांती परमेश्वर" .....

Wednesday, 12 February 2020

शब्दहीन

"Hi" पासून सुरुवात होते, पुढे ओळख आणि नंत्तर निर्माण होतं ते नात,
ह्या सगळ्या दरम्यान असतं ते खूप काही जुळवणारं - ते म्हणजे "शब्द" ....

डोळे नसणारा एक नेत्रहीन, तर शब्द न सुचणारा काय - एक शब्दहीनच का ?
एका शब्दहीनाच आयुष्य कस असेल, कठीण असेल का ?

नेत्रहिनांसाठी असते ब्रेल, तसं शब्दहीनांसाठी कदाचित असेल कला,
जे शब्द नाही करू शकत, ते कदाचित करू शकते अंगी असणारी कला,
पण शब्दहीन आणि कलाहीन अशी सांगड असेल, तर व्यक्त होणार तर काय आणि कसं ....

चुकतंय, खरंच चुकतंय - एक नेत्रहीन, एक मूक बधिर, एक लुळा पांगळा, एक मंदबुद्धी,
नाही शब्दहीन अश्यातलं नाहीये काही, फक्त शब्द नाही उमजत, बाकी किती काय काय आहे,
काही तरी करायचंच असेल तर किती तरी देणगी आहे देवाची,
करायची इच्छा पाहिजे फक्त - २ हात, २ पाय, २ डोळे, २ कान, एक डोकं नाही का पुरेसं ....

बोलकेपणा नसण्याच्या शोकाकुलते पेक्षा, भावनिक झिन्जझीण्या सोसण्या पेक्षा,
वेळेचा किती आणि कसा कसा सदुपयोग करून घ्यावा, हाच असावा ध्यास,
शब्दहीन नव्हे तर वेळ-गुण समृद्ध आहे हे व्यक्तिमत्व, प्रतीक्षा आहे तर ती केवळ नितांत प्रयत्नांची,
दृष्टीकोण महत्वाचा, करणारा असेलच कुणी तर हाता पाया शिवाय पण जीवन जगेल साजेस ...

Monday, 10 February 2020

सुसंवाद

अंतराळ काळोखात, सूर्य प्रकाशात, पृथ्वी पाण्यात आणि मी दबावात,
आयुष्याची परिभाषा करत राहण्यात, जगण्याचा आनंद घेणं राहून जातंय ....

शोध नाही कश्याचाच, दिवस त्रासात आणि रात्र औषधात,
उद्देश्य नाही विचारात, योजना नाही आकारात, कुटुंब नाही हृदयात ....

भावनांना शब्दात रंगवण्यात आणि त्या चित्राला डोळे भरून पाहण्यात,
काव्याकृती जन्माला येण्यात आणि त्याची संगोपना एका कलाकृतीत होण्यात,
जे उत्पन्न होतं मनात, कदाचित त्याचीच व्याख्या करत असावेत लोक - "सुख आणि समाधान" ....

कोणासाठी नव्हे, पण फक्त स्वतःच्या धगधगत्या ज्वाला रूपांतर कराव्यात शीतल प्रवाहात,
जन्म असावा तो वृक्षासारखा, स्वार्थ शोधाल तर मिळेल काय,
पक्ष्यांचं घरटं, जीवांना सावली, फळांची मधुरता, फुलांचा सुगंध आणि वायूस शुद्धता,
नाही असं काही चमत्कारिक, अगदी सूर्य म्हणलं तरी प्रसारित करतो आग ...

शिल्पकार एक मी, काव्य माझी रचना,
आईचा जसं जीव बाळात, तसं नव्हे पण तसच काहीसं निष्पन्न,
मनाची शांतता आणि जीवनाची आकृती - प्रबळ आहे कवी मनाचा सुसंवाद ....

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...