Saturday, 27 October 2018

Clock it out ...

Clock a clock, without any key, the perfect lock,
Slot it out, won’t find the way forward, neither back,
Stare at it, the perplexity just good to mesmerize …

Clock a clock, without any reverse, the long walk,
Not to tire, not to rest, neither drinks break,
Just keep walking, the muscles of steel to the rescue …

Clock a clock, with the flight, of a fiery hawk,
Line of sight, on the way, on the prey,
Not an instant to lose, always on the kill …

Clock a clock, not the ship for a dock,
Something gone missing, looks to be the anchor,
Fishes all the time - salmons, whales and also the sharks …

Clock is the clock, the perfect face and the mock …

Wednesday, 17 October 2018

आयुष्य - Fairness and Experiment

आयुष्य fair नसतं का ,
असतं असतं असतं, नक्कीच असतं ...

आज ऊन तर उद्या सावली,
मनात कधी, काय आणि कसं कालवी,
उधाण वारा, थैमान लाटा,
नाविक धुरंधर, आक्रोश मोठ्ठा,
कुठं शक्य वादळाला थांबवणं ...

बुडून जाणं, काय कुठे कळावं कुणा,
नसावे तरी कोणा काय कल्पना,
क्षणात तरावे आणि शूर व्हावे,
खोलीची नाही तर होडीची कल्पना ...

सर्वकाही क्षम्य, मग काय नाही घडत,
काळानुसार fair पण कदाचित बदलते,
करुनी पाहावाच experiment,
उगाच नको अर्धवट temperament,
Fair तर असणारच न, मग आहेच ना armament ....

Appraisal कठीण कि बायकोशी भांडण !!

असा प्रश्न आहे मला,
Appraisal कठीण कि बायकोशी भांडण,
Appraisal कस ही झालं,
तरी चालू राहतो salary चा meter,
भांडण झालं मस्त,
तर बहुतेक नाहीच मिळत जेवण,
सोप्प नाही येवढ बायकोशी भांडण !!

प्रश्न तसा बराच आहे माझा,
Appraisal कठीण कि बायको शी भांडण,
नाही म्हणलं तरी थोडा chance असतो,
भांडणात सूर जर चांगला गवसला,
तर बायको रुसेल, फुगेल, रडेल, वगैरे वगैरे,
पण Appraisal म्हणलं कि एकच outcome,
रुसायचं मीच, फुगायचं ते मीच आणि रडायचं ते पण मीच,
सोप्प नाही तसं जाणे सामोरे Appraisal !!

काळ तो आला कि प्रश्न पडतोच मला,
तो काळ म्हणजे, Appraisal चा  काळ,
Appraisal कठीण कि बायकोशी भांडण,
कळत नाही उत्तर बुवा नेमक,
नाही म्हणलं तरी प्रश्न कठीणच तसा,
दोन्हीपैकी कश्यालाच नाही option,
Appraisal दर वर्षी येणारच,
आणि बायकोशी भांडण तर 3 वेळच जेवण,
कळत नाही कस ठरवावं Appraisal कठीण कि बायकोशी भांडण !!

कश्यातून आणि कश्यासाठी मुक्ती

कसलं consciousness, आणि कसली energy,
पाहिजे काही तर ती माझी मर्जी,
नको चाकरी आणि नको कसली अर्जी,
मनमर्जी करायला कसलीच नाही हलगर्जी ...

आनंदी राहणं ही वाटत एक युक्ती,
अगदीच जग कोसळलं, सगळंच उभ ठाकलं ,
तरी ते फक्त तुमचं, असतं नीट बाकी सगळं,
छोटीशी आशा, थोडासा विश्वास, किंचितसा उत्साह,
प्रयत्न तोडूनी जीव, उद्देश्य पाहिजे साजेसा,
कळत नाही, मोक्ष म्हणजे कश्यातून आणि कश्यासाठी मुक्ती ...

वाटचाल, जीवना नंतरची

राहते फक्त आठवण, आयुष्याच्या नंतर,
कधीच संपलय जीवन, निर्माण करून अंतर,
न काही आशा, न काही अपेक्षा, न काही पाश,
राहत लक्षात, फक्त एक नातं .. प्रेमाच ...

ओतून जीव जगला, तू कुणा साठी तरी,
ओतून जीव जगलं, कुणी तरी तुझ्यासाठी ,
नाही मोजून मापून काही, शक्य नसतं ते,
जीवात जीव गुंतला, आपोआप घडतं रे,
पश्च्यातच जाणवत, खूप काही झालय,
कमी नाही केल, पण थोडं कमीच पडलय ...

माझ कस बरोबर  हेच भांडलो असताना,
कुठं काय चुकलंय, हेच शोधतो संपल्यावर,
फार मोठ्ठा नाही अवधी तुझ्या माझ्या कडे,
नको चूक नको बरोबर, नको तुझ नको माझ,
साथ आणि श्वास, हीच असते फक्त गरज,
दोन्हीवर पडतो अचानक पूर्णविराम,
कधी तरी संपणार, हेच ठरतंय अंतिम सत्य ...

घे रे तू झेप

निरभ्र आभाळा खाली, कुठं तरी चुकतंय,
कालचक्र कुणालाच कुठं काही कळू देतय,
प्रश्नाचा आरसा नाही सामोरं, प्रतिबिंब नाही सत्याचं,
आनंदाच्या मागावर, प्रयत्न आहेच कि प्रत्येकाचा ....

सावल्यांच्या काळोखात कस शोधायचंय,
ह्या जगाच्या पाठी तर विश्व निजलंय,
कारण आहे मी कि तू, रहस्य उभ थाटलंय,
नाहीचा पाडा आहे तर तो फक्त उत्तराचा,
नाहीच मी सापडणार अस हे लबाड म्हणतय ...

अपेक्षांचं ओझं, भंगांचं सत्र,
काळीज हळवं, गावं सुंदर वाटतय,
प्रेमाचे क्षण, थोडेशे नखरे,
घे रे तू झेप, आग्रह करते वेळ थेट,
किंचित प्रवास, मग आहेच प्रयत्नांची यशाशी भेट ....

आनंदाची कारण

लेकराला बघितल कि आनंद उसळतो माझा,
आणि लेकरू आईच्या कुशीत हसत खेळत आनंदी,
आईने माझ अस काही नाही केल, जिचा मी लेक,
कि तिला बघून तसाच आनंद होऊ नये मला,
मी खूप मोठ्ठा झालोय वाटतंय, कि आईची माया विसरलो आहे आता ...

काम मना सारख आणि त्यात भरगोस यश मिळाल कि प्रसन्न चित्त माझ,
पण तोच आनंद का नाही वाटत बायकोच्या कष्टांचा,
भले पहाटे उठून आवरण, रात्री अपरात्री बाळाला सांभाळणं,
दिवस भर त्रेधा तिरपीट करून कामावर राबणं,
कस मला जाणवत नाही कि तिच्या पण मुळे आहे चालू आयुष्य माझ ...

काही तरी छान सुचलं आणि कवितेत उतरलं कि हर्षित होतो मी,
अल्पायुष्यी का असतो आनंद पण हा, वेळे बरोबर टिकत नाही का,
राहात का नाही आठवण, कि मी आहे खूप नशीबवान,
सगळंच आहे माझ्याकडे, जास्तच दिलय मला गरजेपेक्षा ,
काहीच नाही कमी, फक्त वाढवायची आहेत आनंदाची कारण ...

जस छोट्या छोट्या गोष्टींचं होतं irritation आणि frustration,
तसं का नाही करत साध्या साध्या achievementsच  celebration आणि jubiliation,
आनंदाची कारण मोजकीच कशी, किती हा आनंद दुर्लभ,
काही तरी कराव आणि व्हावा आनंद  पदोपदी , express जशी जलद,
मनात असावा झरा, निघावा त्यातून आनंददायी दुर्मिळ रसद,
फक्त मीच नव्हे, तर आनंदी व्हाव औतीभोवतीच  जग  माझ्यासोबत ...

अनपेक्षित आणि भाग्य

कस सामोरे जायच अनपेक्षितला ,
अनपेक्षित हे होतच राहणार आहे,
चांगल्यात मोडो नाही तर वाईटात,
हाताळणे अनपेक्षित कठीणच ठरते ...

जीवन-चक्र काय, कधी आणि कस फिरेल,
नेम नाही कश्याचा, काय संपेल आणि काय उरेल,
चांगल असेल तर वाईटाची आठवण ठेवावी,
आणि वाईट असेल तर चांगल्याची आशा धरावी,
अनपेक्षित कठीणच पचवणे, भेटणार पण नक्की ...

घडवणार हेच तुम्हा आम्हास, झेपलं तर यश,
नाही झेपल तर मात्र नसाव ते अपयश,
फक्त एक अनुभव, काही तरी शिकवण ...

अनपेक्षित आनंददायी, मनास पुरेपूर भावणार,
किती पण उत्स्फूर्त असे ना , जास्त नाही टिकत,
भान थारावरच असाव, लक्ष्य जास्त ठेवाव,
श्रम अधिक आणि लक्ष्य छोट्याच मोठ्ठ कराव ,
हीच ती वेळ, भाग्य चांगल्यातन उत्तम गाठाव ...  ...

अनपेक्षित त्रासिक, मनास झळ लावून जाणार,
किती पण नैराश्य असे ना, क्षणिक बनू शकतं,
भान थारावरच असाव, लक्ष्य जास्त ठेवाव,
श्रमाची साथ आणि लक्ष्यावर नज़र कायम,
हीच ती वेळ, भाग्य बनवण्या आणि घडवण्याची ,
अनपेक्षितला पचवण्याची, काहीतरी करून दाखवण्याची ...

माणसांची नाती

माणसांची नाती, जश्या असतात वाती,
फक्त ठरवायचं दिव्याच्या कि बारुदाच्या ,
काही असतात गोड़ आणि काही खातात माती ...

मनवतात तशे दसरा आणि दिवाळी,
मज्जा घेतात शेरो-शायरी, कव्वाली,
सांभाळली जाते का साधी घरवाली,
म्हणे निघालोय जिंकायला जग, साले मवाली ...

मित्रांचे मित्र, मेहफिल दारूची ,
शेंगदाणे मस्त, plate म्हणा खारूची ,
संपत नाही, इथंच तू आणि इथंच मी,
बाटली उतरली कि सुंदरच वाटत सगळं,
प्रेम जात ओतू, जिगरी सगळी मित्र मंडळी ही ..

शत्रूपीडा नको म्हणलं तरी घनिष्ट,
म्हणतात काही जण त्यांना आपले वरिष्ठ,
मांडून ठेवायचा ताटात जगभराचा छळ,
आहे कि नाही सांगा पैसा हाताचा मळ,
पण ह्याच मळासाठी चालू असते चळवळ,
त्याच्यासाठी सोसायला लागतेच शत्रूंची कळ ...

Average to Excellent, Personally

Excellent म्हणलं तर छान वाटत,
Average म्हणलं की त्रासच तसा होतो,
भले ही माझ सगळं Average का असे ना,
पण Above Average वाटण्याची आभा औरच आहे काही,
माझ्या गाड्यां पासून माझ्या घरा पर्यंत,
सगळ जरी  'Average' असलं, तरी पण 'Average' चा त्रास होतो,
मी तर 'Above Average', 'Excellent' पाहिजे ...

माझे grades excellent पाहिजेत, salary उच्च श्रेणीची,
मुलगा, नवरा, वडील, भाऊ, मित्र, नातेवाईक कसा चांगला होऊ शकेन,
विचारच नाही केला कधी, तर कसा excellent असणार मी,
वाटतंय एका अर्थी 'Average' मधेच मोडत आहे मी ...

वेळो-वेळी  कठीण प्रसंगी, दर समयी नशिबाची कठोर भिंत,
हीच ती परीक्षा, हेच ते क्षण, हेच ते अतूट प्रयत्न,
कसा काय अडकलोय, कसा काय रखडतोय, कसं ठरतंय अशक्य,
विचित्र कसं येवढ घडतंय, कि आहे सगळं साजेस,
'Average' ला गाठलंय, हेच झालय का मोठ गंतव्य,
कुठे तरी काही तरी चुकतंय, कळत नाहीये जे ...

अर्धा glass भरलेला, कि अर्धा glass रिकामा,
आहे मी भाग्यवान, कि नाही नशिबाची साथ,
'Below average' नसण्याचा नाही होत आनंद,
'Excellent' नसल्याचा होतोच तसा त्रास,
पण खरंच आहे ना अर्धा ग्लास भरलेला,
आनंद आहे मानण्यात, नाही कुरकुर करण्यात,
आनंदी राहण्यात नक्कीच 'excellent' व्हायला हव,
कदाचित मगच मुलगा, नवरा, वडील, भाऊ चांगला होणं शक्य ...

प्रवास एकट्याचा

आयुष्य हे एकमेका सोबत असलं, तरी ते एकट्याच आहे,
सगे-सोबती, मित्र, प्रेमी सगळे आहेत,
पण आलो मी एकटाच, जाणार तो ही एकटाच आहे,
दुःख मलाच सोसायचं, आणि सुखाचा अनुभव माझाच आहे,
ह्या एवढ्या मोठ्या जगात कसा मी एकटा आहे ...

प्रत्येक क्षणी फक्त मीच माझ्या सोबत आहे,
दर विचार, दर शब्द, दर कल्पना,
कस कुणी समझेल, कस कुणी जाणेल,
ते माझ्या मनी आहे, ते मलाच माहित आहे,
काहीच न करू शकण्या एवढा मी खरंच एकटा आहे ...

माझ ध्येय, माझा ध्यास, माझ क्लेश, माझा श्वास,
प्रयास तो माझाच, विश्वास तो पण माझाच,
कष्ट ते माझे, आनंद तो माझाच,
सगळ आहे माझच, मग का नाही मी  मानत,
कि प्रवास हा माझा, आयुष्य शेवटी एकट्याचंच ...

नित्य नियमाने, गहन विचाराने,
माझ मला कळत आहे, सगळ्यांच्या सान्निध्यात,
आहे मी एकटा, जगत आहे  एकाकी,
करत आहे प्रवास,  माझा मी एकट्याचा ....

Health - पटतंय का बघा

मी प्रियकर आणि ती प्रेयसी, अशी ही माझी health,
बायको नाही बरका, ही फक्त प्रेयसीचा असायला पाहिजे,
कारण बायको तुमच्या साठी झटते,
आणि तुम्ही दर क्षणी प्रेयसीसाठी ,
किती ही नखरे केले, तरी तिच्या मागे पळावं अशी,
अशी demanding आहे माझी खोडकर प्रेयसी ...

तिची सटकली की माझ काही खरं नाही,
साधी नसते बारीकशी शिंक, की थोडासा  खोकला,
थोडंस दुर्लक्षाचं कारण, रुसलीच म्हणजे समझा,
जमत नाही नुस्त पटवून, आहे  भलतीच high maintenance,
व्यायाम, vitamins, proteins, fiber चे  सारखेच मागते gifts,
नाही मिळाले तर नाही म्हणत काही, direct देती दणका,
अशी deadly आहे माझी कातिल प्रेयसी ...

नाही फक्त body, आहे mind सुद्धा,
emotions, feelings, pressure आणि stress,
तिखट आणि मीठ जशे पाहिजे प्रमाणात,
सगळेच महत्वाचे हीच मन राखण्यात,
अशी रुचकर व्यंजन आहे प्रेयसी माझी ...

बघा जमतंय का, लावता का हिच्यावर जीव,
नाही कधी सोडणार साथ, आहे खूपच प्रामाणिक,
द्याल तुम्ही प्रेम, नक्कीच मिळेल परत दुप्पट,
लावून बघाच एकदा जीव, पडणार नाही ही कमी ...

माणसाची किंमत

एक माणूस कुठल्या तरी जगात मौल्यवान आहे का,
माझा जवळचा नसला तरी  कुणाच पूर्ण जग आहे का,
नसेल वाटत कुणाला तरी, कुणाचा मानाचा तुरा आहे का,
माझा कुणी ही नसला तरी, कुणाचा जीवनाचा आसरा आहे का,
किंमत कुणाची कुणी करू नये, कुणाचा तरी हिरा आहे का ...

म्हंटलं तर आपले, नाही म्हंटलं तर कुठले,
चांगल्यासाठी झगडणारे कि वाईटावर टपलेले,
सवयी प्रमाणे चालणारे, स्वभावाप्रमाणे वागणारे,
कशेपण असले तरी आपल्या जगाचा भाग असणारे,
किंमत असलेले किंवा नसलेले, आपल्या आयुष्याचा भाग आहेतच ना ...

थोडंस हसवणारे, कधी रडू आणणारे,
माणसंच आहेत जे असतात किंमत लावणारे,
कुठल्या ना कुठल्या कारणाने आठवणीत राहणारे,
किंमत लावू त्येवढी कमी वाटणारे,
राग-राग करवून आपलेशे होणारे,
लेखू तेवढे कमी अशे प्रेमळ माणसं जगातले,
जवळचे असतात काही, जीवाला घोर लावणारे ...

आनंदाची कल्पना - काळोखाची दिवाळी

लागते का करावी तुम्हा आनंदाची कल्पना,
वाटत का ठरावी ही वेळ, क्षण भंगुर,
हतप्रभची व्याख्या राहते का मना उभी,
डुंकावते का सावली दुःखाची चहोकडुनी ,
चुकलो का मी कुठे, अस हे झालच कस ...

लागते का करावी तुम्हा आनंदाची कल्पना,
आहे का जगात कुणी, राहील उभ माझ्या सोबती,
नाही न निसटणार ती  किंचितशी आशा,
ठरेल का ती पुरेशी, सरेल का आज पण दिवस,
कुठं मी शोधू, सुख आहे लपलं कुठं ...

लागते का करावी तुम्हा आनंदाची कल्पना,
कशी ही विडंबना, किती देव निष्ठुर,
नैराश्याचा काळोख पसरला माझ्या भोवती,
दुःखाची दिवाळी लागते करावी साजरी,
दिलस कस देवा, मलाच एवढं दुर्भाग्य ...

करावी लागत आहे आनंदाची कल्पना,
पडली आहे पदरी काळोखाची दिवाळी ...

दैवत - आई आणि बाबा

नाही मी बघितला प्रत्यक्षात देव,
बघितले आहेत ते फक्त आई आणि वडील,
चिमण्या बाळा सारख वाढवलं,
पदोपदी सावरल, प्रेमाने न्ह्यार्ल ,
आहे कुणी माझे देव, तर ते आई आणि वडील एकमेव  ...

नाही कदाचित काही जगा पेक्षा केल वेगळ,
पण घडवलं आहे मला त्यांनी ओतून जीव,
खूपच पुण्य असतील माझे गतजन्मी ,
मिळाले नसते हे आई बाबा ह्या जन्मी,
किती सुदैवी, वाढलो त्यांच्या चरणी ...

आईची माया आणि बाबांचं प्रेम,
मन भरून मिळाल, नाही जेमतेम ,
नसले ते आज, तरी जीवंत आहेत आठवणीत,
मार्ग दर्शवतात, नाही कधी कमी पडत,
आशीर्वाद येवढे की आयुष्यभर पुरतील,
शक्य आहे का, पुन्हा एकदाच भेटतील ...

आईच व्यक्तित्व, किती आहे विशेष,
सगळे दिले आनंद, सगळे घेतले क्लेश,
वडिलांचा आवेश पण केला आहे परिधान,
कशी ती कर्मठ, करते सगळे कर्तव्य,
आहे अजून पुढे आयुष्य, होईल कस समाधान ..

नाही मिळणे दुसरे, अशे देवाने दिले,
देव नाही बघितला, बघितले ते आई आणि बाबा,
आदर्श आहेत ते माझे, एकापेक्षा एक ,
नशीब माझ चांगल, मी त्यांचाच लेक ...

Tuesday, 16 October 2018

त्रास त्रासिक असतो

त्रास अर्थात त्रासच असतो,
कुणी म्हणलेलं ऐकलं नाही मी,
आज खूप मजा आली, मस्त त्रास झाला,
हे ही कधी ऐकलं नाही मी,
आज खूप त्रास करून घेऊ यात ...

त्रासाचे पण प्रकार असतात,
एक त्रास जो स्वताहाच वाईट झाल्यावर होतो,
दुसरा त्रास जो दुसऱ्याच चांगल झाल्यावर होतो,
त्रास तसा त्रासिकच असतो,
कसा ही असला तरी जीवाला घोरच लावतो ...

त्रास छान पण असतो बरका ,
कष्ट केल्याचा त्रास असा की सुख अंगी लागल्या शिवाय राहणार नाही,
आणि कष्ट न केल्याच सुख त्रास दिल्या शिवाय राहणार नाही,
दोन्ही प्रकारे त्रास आहेच की, कष्ट करायचा काय आणि कष्ट नाही घेण्याचा काय,
त्रास म्हणजे लग्नासारखाच की काय मग,
" जो खाये वो भी पछताए, जो ना खाये वो भी पछताए ",
त्रास तसा कष्टदायकच दिसतोय ...

त्रासाचे फायदे पण असतात  बरका,
कामावर जायला नको, त्रास फार उपयोगी येतो,
पोटात दुखणे, कंबर धरणे, अशेच त्रास कामी येतात,
जेल मधून सुट्टी पाहिजे, हमखास उपाय तब्येती चा त्रास,
त्रासाचा फायदा करून घ्यायला, कमी कुठं पडत का कुणी ...

त्रास पण  तसा त्रासदायकच असतो,
कुणालाही नकोच असतो, पण झाल्या शिवाय राहत नसतो,
जडच पडतो, छोटा किंव्हा मोठा, कसा ही असो,
थोडा प्रेमाने हल्का होतो, पण तसा जडच पडतो ...

काही तरी वेगळ

काही तरी वेगळ ल्ह्याव म्हणून बसलोय,
पण विश्व हे स्वताहातच गुंतलय,
काम, कुटुंब, घर, तब्येत, growth,
ह्या पलीकडं वेगळ काय,
प्रश्नांचं उत्तर कुठं सापडतय ...

प्रयत्न करणार, वेगळ्याच ध्यास आहे,
स्वताहात एवढं गुंततो का आपण,
कि कुणा बद्दल लिहणं मनात पण येऊ नये,
आज स्वताहाच नाही, कुणाच तरी टिपणार ...

कोणी खुश आहे तर कोणी झुंझतयं,
कोणी स्वताहात तर कोणी दुसऱ्यात गुंतलय,
कोणी दोन वेळच्या भाकरी साठी झगडतय,
तर कोणी आयुष्यात सुखाने रमलाय,
कुणाचा कुणाला पडलय, मजेत आयुष्य चाललय ...

काही तरी वेगळ म्हणजे काय,
कुणाच कुणाला काही काच पडावं ,
मी आणि माझ आयुष्य छानच चाललय ...

नक्की काय करायच, आणि कस,
मजा नको, सुख नको, आणि काम कुणी करायच,
विचार तरी करावा, पुण्याच काही जमेल का,
रोजच्या आयुष्यात नित्य कामा सोबतच,
एखाद तरी वेगळ अस काही ऊमझेल का ...

रोज जसा सौख्याचा असतो निर्धार,
तसाच दुसऱ्याचा करेन का एकच विचार,
काही तरी चांगल असा प्रयत्न होणार का,
काही तरी वेगळ स्वतः पलीकडे करणार का ....

एक romantic कविता, जमतीये का बघावी

संगिनीची कल्पना मनात यावी,
मृगनयनी, काळजात जशी कट्यार घुसावी,
चंचळ, प्रेमळ, मंजुळ, बावरी,
एखादी कविता जशी मनात उतरावी ...

मृदूळ, सुंदर, हळवी, वेंधळी,
हसावी अशी सुरांची मधुरता जशी,
बोलावी अशी पारिजाताची कोमलता जशी,
एखादी अप्सराच धरावर उतरावी, तशी ...

जन्मो-जन्मीची  गाठ बांधुनी,
क्षणो-क्षणी आठवणीत राहावी,
प्रेयसी आयुष्याच सोनं करुनी,
मनोमनी घर करणारी,
जादूगाराने एखादी जादू करावी तशी ...

भलतीच कठीण आहे बुआ.. ह्याच्या पलीकडे जमणार नाही :-)

मज्जा

दिवस कसा मजेत जावा,
उषःकाळी असा निर्धार असावा,
काहीसा कठीण, काहीसा अवगढ,
काहीसाच कठीण, काहीसाच अवगढ,
थोडीशी मस्करी, थोडीशी बडबड,
आज 'मज्जा आली', हा रात्री भाव असावा ...

तिखट, कडवट, काटेरी, दुर्गंधी,
सगळ असणारच कि, सारखच कस साध आणि सरळ,
पण "Beauty lies in the eyes of the beholder",
काही कराव बेरीज, काहीस वजा,
मिळू शकेल नक्कीच, पाहिजे असलेली मज्जा ...

अशक्यच आहे, हे ही शक्य,
अता कस, अता काय, हा पडतो प्रश्न,
मज्जा कसली, जगणं पण कठीण,
वेडा होयच बाकी आहे, हे होतात बोल,
कसब लागते पणाला, पण दिवस खडतर,
नाही रोजच येत मजा, नशीब ठरत बलवत्तर,
तरी ही, प्रयत्न हा आहेच आपल्या हाती,
काय सांगाव, त्यात ही मजा आपणा सापडावी,
चमत्काराची आशा काच सोडावी ...

मज्जा अनुभवायची इच्छा कायम असावी,
दिवस कशे ही येऊ शकतात,
काय सांगाव आज शेवटची ठरावी,
पण, दिवस मजेत जावा,
उषःकाळी हा निर्धार प्रबळ असावा ...

Complexity, the difficulty

Am human, Am complex,
Let's keep it simple, say often,
Let's make it complex, desire never ...

It's pretty simple, and am happy,
Do I realize, am born human,
To attempt the impossible,
Naah, simple is better, Complex is killer,
Will I want the difficult ever ...

One sows, the other reaps,
Who to thank, wonders in heaps,
What am upto, while someone leaps,
None to blame, If I end my time in weeps,
Will I set me up for something much braver ...

Admit please, am complex, the complex of all, 
It's for me to answer the call,
It's not just a life, it's a gift of opportunity,
It's for me to take on the complexity ...

Am no one, am no where,
It's not that simple, isn't it,
But I am supposed to be complex,
Sitting on mass of confusing and perplex,
Only time to answer the luck - Do I own just enough pluck !

One for smile and the ....

Quite a lot lies forward,
In the mirrors, smells a coward,
Cool going, lovely comfort,
Dream should I, it will hurt,
Well, a healthy lunch ends with a burp ...

Just for smile, ear to ear,
Challenge a little, year after year,
Push the limits, bottoms up,
Go, have some beer ...

Dream must you,
stop not till it's hard and rough,
Just for smile, when going gets tough,
beer's always to rescue ...

Not for worry, not for stress,
just for smile and the love,
buy the pitcher and gulp a beer ...

Not just for fun, know your fun

Is Life just for fun,
Think hard, Think more, 
Think as much as you like,
You still might find, 
probably it is ...

Live just a day,
May be not a day,
Just half a day,
May be not half a day,
Just an hour,
May be not an hour,
Just a minute,
May be not a minute,
Just a second,
Whatever you decide,
Live just 'the time', 
just for fun ...

What will it be?
A little simple, a little sweet,
Hell lot adventurous, Damn more crazy,
A job to work, a rain to harvest,
A relaxing nap, an exotic lunch,
A six-pack body, a six-digit salary,
Plenty of friends, a lovely family,
Thinking Solitude, a noisy outing,
Working lunch, photo with pouting,
Could be all of it,
or none of this ...

It's for you,
to find some fun,
Live for that day,
or live every day,
Not just for fun,
know your fun,
live your fun ...

Mobile 'देवा' चरणी आरती

Mobile एक अत्यावश्यक गोष्ट नव्हे, तर आज काल देव झाला आहे ...
त्या 'देवा' चरणी, माझ्या कडून एक आरती समर्पित
-----------------------------------------------------------------------------------------

जय Mobile राया, पडतो आम्ही तुझ्या पाया,
कुठला हि धर्म, कुठली पण जात,
व्यापक तू किती, औरच तुझी बात,
नाही कुणी तुझ्या शिवाय राहत ...

हे Mobile राया, सुंदर तुझी काया ,
Wifi, Bluetooth आणि Network असे तुझे बलाढ्य हात,
वापरात आहेस सगळ्यांच्या, आई असो किंवा तात,
वाजतोस तू मस्त, गाणी छान छान गात ...

देवा रे देवा, वाटतो तुझा हेवा,
तुजला वाहतो फुलं, करून तुला Charge,
करतो दिव्याची आरती, टाकून तुझ्यात Recharge,
पाहतो आम्ही वाट, तू नेहमी नेहमी वाज ...

प्रिय तू Mobile ईश्वरा ,
होते अस कि तुझ्या समोर बाकी सगळं विसरा,
Whatsapp, Facebook, Twitter तुझे अस्त्र,
मिळतात तुला सुंदर सुंदर cover ची वस्त्र,
नाही तुला काहीच पर्याय,
तूच खरा प्रभू, सगळ्यास तू लाभ ...

Just "One" wonderful thought

A thought,
tiny, unseen, untouched
silent, unheard, unfelt ...

Yet, a thought,
so powerful, so touching, so defining ...

A thought speaks,
A thought does,
A thought creates,
A thought destroys,
More than anything, a thought thinks ...

Impulse it is,
Electrical it is,
Electriying it is ...

Acquire a thought,
Nourish it, make it grow,
Wonder it can do,
if can be strong ...

A thought it will take,
to do "one" wonderful,
to give "one" wonderful,
to help "one" wonderful,
to offer "one" wonderful,
to extend "one wonderful...

Nothing much, just "one" wonderful thought ...

Wonderful - not won yet

Is there just one thing,
not many, not even two,
is there just one thing,
that I could do is wonderful ...

Is there just one thing,
not many, not even two,
is there just one thing,
that I want to do is wonderful ...

Is there just one thing,
not many, not even two,
is there just one thing,
any experience I could offer is wonderful ...

Is there just one thing,
not many, not even two,
is there just one thing,
any help I could extend is wonderful ...

Is there just one thing,
not many, not even two,
is there just one thing,
that I could give is wonderful ...

Is there just one thing,
not many, not even two,
is there just one thing,
that I prayed is wonderful ...

None, none, none,
Not even one,
wonderful is not won,
Not yet, not yet, not yet ...

Struggle चा अनुभव

आईशी गप्पा माराव्यात म्हणून बसलो,
तर आईने आयुष्य कस असावं,
ह्याची येवढी सुंदर परिभाषा दिली,
कि कळत नाहीये, एवढं सहज अझून  कुणी समजावू शकत का ...

'नाही मिळाल' तर वाईट वाटू नये,
आणि 'नाही मिळत' म्हणून गप्प राहू नये,
जीवनात "Struggle हा असतो" नव्हे,
तर जीवनात "Struggle हा पाहिजेच"..

परिभाषा पटली मला,
मनापासून आवडली ...

परत एकदा जाणवल कि,
आपण किती सुदैवी आहोत,
कि आपल्या नशिबी,
आई आणि वडिलांचे एवढे आशीर्वाद आहेत ...

बहुतेक, आयुष्यात ह्याचीच आवश्यकता असते ...

बाल कविता : कावळा

कसा हा कावळा, मस्त काळा सावळा,
छान रुबाबदार, ऐटीत  कावकावणार ,
लहानपणा पासून ऐकतोय, शेणाच्या घरात राहणारा,
असा हा काळुराम, चिमणी ला त्रास देणारा ...

राज्य ह्याच छोट, छोटीशी भरारी,
उंच नाही उडता येत, लढण्याची नेहमी तयारी,
कुणाशी भांडणारा आणि कुणालाही वैताग देणारा,
नेम नाही काही, अशी ह्याची ख्याती ...

खूप तशी हुशारी, लपवत नाही कधी,
IQ मध्ये सगळ्यात पुढे, विश्वास नाही बसत,
कुठलाच प्राणी नाही ह्याला घाबरत,
पण कावकाव येवढी कर्कश्य, कुणालाच नाही आवरत ..

कसा हा कावळा, मस्त काळा सावळा,
राहतो असा, जसा एखादा शूर मावळा,
कसा हा कावळा, मस्त काळा सावळा ...

प्रेम आणि काम

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
तुमच आमच same असत ..
तसच काम म्हणजे काम म्हणजे काम असत,
नाही म्हंटलं तरी, कंटाळवाणं जाम असत ...

प्रेम हे  full-time काम असू शकत,
कामा वर थोडस हि प्रेम नसू शकत,
असेलच कुणाच तर ते fraud असत,
कामावर प्रेम असणं तस अवगढच असत ...

प्रेमात एक सुंदर प्रेयसी असते, छान love-letter असत,
कामात खडूस boss आणि जोडी ला,
कुणाच तरी काम तुमच्या पेक्षा  better-ach असत,
म्हणून कामावर प्रेम असणं शक्य नसत, म्हणजे शक्य नसत ...

प्रेमात संध्याकाळी ती दिसायची वाट पाहणं असत,
तिला द्यायला white, yellow आणि red roses असतात,
कामात कामा पेक्षा 11 आणि 4 च्या चहाची ओढ जास्त असते,
आणि किती हि महत्वाचा असल तरी, संध्याकाळी 6-ला काम तमाम असत,
कस हि झाल तरी काम हा  9 तासाचा नको वाटणारा व्यायाम असतो ...

तस काम जरा अवझडच असत,
काही विचित्र नाही त्यात,
प्रेम म्हंटलं कि आनंदाचे झरे मनात,
विचित्र नाही काही त्यात,
नाही म्हंटलं तरी, काम कंटाळवाणं जाम असत ...

Disclaimer :
ही फक्त एक हास्य कविता करण्याचा प्रयत्न आहे,
ह्या कवितेचा सत्य  घटनेशी काही हि संबंध नाही ...

Little bit of 'pun'ification

Attempt never tried,
Not my cup of tea i say ..
Pun intended, intentional ..

Turn Page,
write notes,
lest Larry ..

Close Gates,
kick it,
lest Bill ..

Forget Jobs,
better not,
lest Steve ..

Smell Musk,
little deep,
lest Elon ..

Last one...

Feel Ray,
both eyes,
lest Lisa ..

Half Way Through !!

Not in fantasy, but in reality,
Battled, bruised, engrossing, lively, years a few,
Amazed, am half way through !!

Look back, look forward,
What has passed, what will come,
It's a junction, time is the crew,
Really, am I half way through !!

Thank some for kindness,
Plead some for mistakes,
Feel some for softness,
Forgive some for harshness,
Expecting now the new,
Really, I am half way through !!

Beautiful are memories,
Painful are wounds,
Lovely are moments,
Mysterious are events,
It is gone, I am through,
Yes, Here's cherishing my half way through !!

चार ओळी नात्यांच्या

नाती जशी आयुष्य तस,

काल, आज आणि उद्या, नेहमीच महत्वाची,

न जपावी लागणारी आणि नेहमीच गोड़ वाटणारी,

जास्त नसली तरी मोजकी तरी असावीत,

आयुष्य घडवणारी असावीत ...

अहसास

दर्द कुछ   अनजाना  सा था, अपना बनने लगा है, परायेपन का अंदाज़ा हो गया है शायद, दर्द को दर्द का अहसास हो गया है शायद, अपनाने की ज़िद्द पे कुछ अ...